• Home
  • About Us
  • Deposit
  • Loan
  • News & Events
  • Annual Report
  • Contact Us
Login
"राहूल अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०१/०९/२०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता स्थळ :- श्री निवृत्ती शेठ सांस्कृतिक भवन, शिरोली बु||, ता.जुन्नर,जि.पुणे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश सहादू शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे .सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती. संस्थेचा ३४ वा वार्षिक अहवाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 👇 डाउनलोड करा
  • मासिक मिळकत ठेव
  • ठेव योजना अशी योजना आहे कि, एक विशिष्ठ रक्कम खातेदाराच्या नावावर ठेवली जाते. जमा केलेल्या रक्कमेवर ठराविक व्याज मिळते. खात्याच्या नियम व अटीनुसार ठरविलेला वास्तविक व्याज दर हा कुठल्या प्रकारचा पैसा जमा केला, किती कालावधी साठी ठेवला गेलेला आणि कुठल्या ठिकाणी जमा केलेल्या रक्कमेवरून ठरू शकतो.

  • आर्वत ठेव योजना
  • आवर्त ठेव खाते म्हणजे, त्यामध्ये गुंतवणूकदार पतपेढीत एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ठ कालावधीसाठी जमा करतो (साधारणता: एक ते पाच वर्षासाठी). ह्या योजनेचा अर्थ, गुंतवणूकदार एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. एक छोठी महिन्याची ठेव, आवर्त ठेव योजना जमाकर्त्याला एक चांगली रक्कम त्याच्या परिपक्वतेच्या काळात मिळवू शकतो. ह्या वरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तिमाही गणले जाते.
    ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली रक्कम एका विशिष्ठ कालावधी साठी गुंतवू शकतो आणि तो/ती/ते खालीलप्रमाणे मिळकत मिळवू शकतात. ह्या योजनॆत कमीत कमी रू. १००/- रुपयापासून रक्कम गुंतवू शकता.

  • राहूल दैनंदिन ठेव योजना
  • ह्या योजनेत दररोज बचत करण्याची योजना मांडली आहे. ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार कमीत कमी रू. १०/- किंवा अधिक दररोज बचत करू शकतो. आमच्याकडे अधिकृत प्रतिनिधि आहेत कि जे गुंतवणूकदारांच्या राहत्या घरातून किंवा त्यांच्या व्यापाराच्या जागेवरून दररोज रक्कम गोळा करतात. दैनदिन अधिकृत प्रतिनिधीना खाते पुस्तक अपडेट करण्यासाठी संगणकयुक्त मशिन पुरवण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांचे खाते पुस्तक प्रत्येक तीन महिन्यातून एकदा जवळच्या शाखेत व्यवस्थित पड्ताळ्ण्यात येईल. गुंतवणूकदारांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो.

  • बाल विकास ठेव योजना
  • DOWNLOAD SECTION

    या योजने अंतर्गत तुम्हाला आकर्षक व्याज दर मिळेल जे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या संगोपनासाठी खूप मदतीस येईल.

DOWNLOAD SECTION

  "सूचना "

३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २०२३
"अक्रियाशील सभासद " " वर्गीकरणा " Download सभासद अर्ज Download बचत खाते अर्ज Download ठेव अर्ज Download वैयक्तिक कर्ज अर्ज Download व्यावसाहिक कर्ज अर्ज
राहूल अर्बन यशस्वी वाटचाल

२९ जानेवारी १९९० रोजी "राहूल" चा जन्म झाला. ३१ मार्च १९९० रोजी राहूल चे नामकरण मोठ्या दिमाखात झाले. आणि १ एप्रिल १९९० रोजी राहूलने प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली. वरील उक्तीप्रमाणे मित्रांनी एकमेकांना सहकाराची साद दिली आणि सर्वांनी द्वेषभावनेचा स्पर्श हि न करता आपल्या मित्रांना प्रतिसाद दिला. सहकारातील ७ मूलतत्वांनी सहकाराची बाग फुलविली त्या बागेतील "राहूल " हे एक सुंदर रोपटे आहे. खुले सभासदत्व लोकशाही नियंत्रण, स्वायतत्ता आणि निर्णय स्वातंत्र्य सभासदांचा आर्थिक सहभाग, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती, सहकारी संस्थांचे एकमेकाशी सहकार्य आणि समुदायप्रती निष्ठा या सात मूलतत्त्वावर राहूलच्या संचालकांनी व सभासदांनी सदेव अंगिकार केलेला अहे. संस्थेने गेल्या २५ वर्षात अथक परिश्रमाने व प्रामाणिकपाणाच्या जोरावर दैदीप्यमान भरारी घेतली आहे. ५२५ सभासदांनी सुरु केलेली संस्था आज ८५५० सभासदांना सेवा पुरवित आहेत. २००० ते २००५ या पंचवार्षिक काळा मध्ये संस्थेने केवळ दोन वर्षात नवीन पाच शाखा सुरु केल्या आहे आणि त्यामुळे या कालावधीत संस्थेच्या सभासद संखेमध्ये १०० % पेक्षा अधिक लक्षणीय वाढ झाली.
व्यवसायात प्रचंड वाढ होत असताना देखील संस्थेने गुणात्मक दर्जा सोडला नाही आणि निव्वळ ऐन. पी. ए. चे प्रमाण गतवर्षी १.९० % कमी राखण्यात संस्था यशस्वी झाली आहे. संस्थेने ०१/०४/१९९० ला भायखळा शाखा, ०१/०१/२००० ला नवी मुंबई शाखा, १९/०६/२००२ ला नारायण गाव शाखा, २७/०१/२००३ ला कल्याण शाखा , २७/१०/२००३ ला ठाणे शाखा , १६/०५/२००४ ला विलेपार्ले शाखा, ०५/०६/२००४ ला जुन्नर शाखा सुरु केल्या. २००० ते २००४ या पंचवार्षिक काळात ६ शाखांचा विस्तार केला गेला.
संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आज अधिकारी मिळून २४ जन काम करत आहेत. त्याच प्रमाणे तांच्या कामात सर्व शाखां मध्ये मिळून २२ दैनंदिन वसुली प्रतिनिधी सहाय्य करीत संस्थेच्या व्यवसाय वृधीत मोलाची भर घालीत आहेत. हे सर्व जन सभासदांशी अत्यंत विनम्रपणे वागून त्यांना बँकिंग सेवा त्यांच्या दारापर्यंत पुरवून अमुल्य योगदान करीत आहेत आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे संस्था घोड्दैड करीत आहे.




दाम दुप्पट ठेव योजना

गुंतवणूकदारांना एका विशिष्ट्य कालावधीत आपली रक्कम डबल करण्याची संधी देत आहे. ह्या योजनेसचे नाव सर्वच सांगून जात आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत एक विशिष्ट्य रक्कम एकदाच गुंतवुन कमीत कमी वेळात दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ह्या योजनेनुसार गुंतवणूकदारांची जमा केलीली रक्कम दामदुप्पट ठेव कालावधी १२० महिने सर्व साधारण , जेष्ठ नागरिक ११६ महिने.



योजनेच्या नियम व अटी

१] व्यक्ती खाते उघडण्यासाठी संस्थेच्या सदस्य होणे आवश्यक आहे. नसल्यास प्रवेश शुल्क रु. ५००/- भरावे.
२] व्यक्ती वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. व्यक्ती वय १८ पेक्षा कमी वर्षे असेल तर पालकांची स्वाक्षरी घेणे.
३] खाते उघडण्यासाठी वेळ खातेदार वेळी साक्षर किंवा अशिक्षित असला तरी संदर्भ दिलेली व्यक्ती संस्था जुन्या खाते धारक असणे आवश्यक आहे.
४] खाते शाखा व्यवस्थापक पुष्टी नंतर उघडले जाईल.

संस्थेची वैशिष्ट्ये

* सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत

* इतर आकर्षक योजना

* ठेवीवर अधिक व्याजदर

* जेष्ठ नागरीकांना ठेवीवर ०.२५ % अधिक व्याजदर

* संपूर्ण संगणकीकृत कामकाज


Download our mobile Apps

We Accept

Follow Us

Copyrights © 2016 Rahul Urban . Design by prasansa infotech