साम्मानीय बंधू भगिनींनो
श्री गणेशाच्या कृपेने व श्री साईबाबांच्या शुभाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या राहूल अर्बन को - ऑप . क्रेडीट सोसायटी लि. या संस्थाचा २५ वर्षाचा यशस्वी कालखंड पूर्ण झाला याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
दिवसेन दिवस बँकिंग क्षेत्रात व त्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणारे सहकारी चळवळीत अमुलाग्र बदल होत आहेत. जेष्ठ समाजसेवक माननीय श्री. अण्णा हजारे यांनी पतसंस्थेतील ठेवीदाराच्या हितरक्षणासाठी चालवलेल्या आंदोलनातून बँकिंग मधील आर्थिक निकष पतसंस्थावर शासकीय आदेशाद्वारे आणि सुधारीत कायदा, नियम व उपविधिद्वारे बंधनकारक करण्यात आले आहेत आणि त्याद्वारे पतसंस्थेमध्ये आर्थिक शिस्त राबिवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन करीत आहे.
सुधारित कायद्यामुळे बँकिंग क्षेत्रातील बऱ्याच तरतुदी अमलात आलेल्याआहेत. त्यामुळे सहकारी चळवळीतील, पतसंस्था मागील कार्य पद्धतीत आर्थिक शिस्त वाढत आहे.
शासनाने पतसंस्थावरील व्याजावरील निर्बंध काढले असले तरी त्यांच्यावर अनैतिक स्पर्धा टालानेच्या दृष्टीकोनातून मर्यादा घातल्या आहेत. आणि दिवसेंदिवस व्याज दुरावा कमी होत आहे. त्यामुळे पतसंस्थाना विनामूल्य सेवा देणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चाललेले आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय खर्चात देशातील महागाईमुळे दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संस्थेचा व्यवसाय वाढीविन्याच्या दृस्ठीने एकदिलाने प्रयत्न करणे हि काळाची गरज आहे.
अशी विनंती मी आपणा ससंचालक मंडळाच्या वतीने करत आहे.
सुधारीत नविन कायदा, नियम व उपविधीमुळे खालील अमुलाग्र बदललागू झाले आहेत.
१] सरकारी संस्थाना “स्वायत्तता” प्रदान करण्यात आलेली आहे.
२] सहकारी संस्थाना “व्यावसायिक व्यवस्थापन” करिता मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत.
३] “कडक व स्वतंत्र लेखापरीक्षणाचे अधिकार” सभासदांना देण्यात आलेले आहेत.
४] संस्थेच्या कारभारात “क्रियाशील सभासदांचाच” थेट सहभाग लागू करण्यात आलेला आहे.
५] “क्रियाशील सभासद” यांनाच संचालक मंडळावर काम करण्याचा व निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे.
६] थकबाकीदार सभासदास संचालक मंडळावर निवडणूक लढवण्याचा तसेच मतदानाचा अधिकार काढून टाकलाआहे. तसेच थकबाकीदार सभासदामध्ये कर्जदाराप्रमाणेच जमिनदाराचाही समावेश करण्यात आला आहे.
७] बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना “बँकिंग रेग्यूलेशन अॅक्त १९७९” मधील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत.
८] ज्या संस्थाना शासकीय सहकार्य नाही अशा सहकारी संस्थेवरील निबंधकाचे निलंबनाचे अधिकारमर्यादित केलेले आहेत.
९] संचालकाच्या संस्थेवर निर्बंध आणून राखीव जागा कमा करण्याच्या मार्गदर्शक सूचना असल्यातरी महाराष्ट्र राज्याच्या सहकारी कायद्यात पुन्हा सुचीवण्यात आल्या आहेत.
१०] सहकारी संस्था स्थापनेचा हक्का “मुलभूत हक्का” मध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे.
कर्मचारी आणि दैनंदिन वसुली प्रतिनिधी मार्फत आपल्या संस्थेत अथक प्रयत्नामुळे व सभासदांशी थेट संपर्कामुळे आपल्या संस्थेच्या व्यवसायात भरीव वाढ होऊन आपण २५ कोटीच्या टप्प्या जवळ आलेलो आहोत. यांचा मला सार्थ आनंद होत आहे. त्यामुळे आपल्या संस्थेच्या उलाढालीत २०% ने वाढ झालेली आहे.
याबद्दल मी सर्व ठेवीदार, कर्जदार, सभासद व हितचिंतक यांचा आभारी आहे.
आपल्या संस्थेच्या मागील वर्षाचा ढोबळ एन. पी. ए. ६ % होता तो चालू वर्षी ६.१९ % असा झाला आहे. ठेवितील वाढीच्या प्रमाणात कर्ज मागणी कमी आल्याने व कर्ज वाटप कमी झाल्याने एकूण कर्जाशी ढोबळ एन. पी. ए. मध्ये ०.१९ % ने वाढ झालेली आहे. तसेच आपला मागील वर्षाचा निव्वळ एन. पी. ए. २.७३ % असा होता तो अहवालाशी संस्थेस झालेल्या नफ्यातून ४०.३५ लाखाची भरगोस तरतूद केल्यामुळे या वर्षी १.९० % झालेला आहे. आपली संस्था भक्कम अशा आर्थिक निकषावर उभी असून आपल्या संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत असून त्याचे बाजार मूल्य अनेक पतीने वाढले आहे. आपल्या ठेवीदारांचे हितसंबंध जपण्यासाठी आपला ७.२३ कोटीचा निधी जिल्हा बँक व इतर सुदृढ बँकमध्ये गुंतवला आहे. आपली संस्था रोख शिल्लक हि अनूत्पदनितनिधी मानून तो कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करीत असून नविन कायदा व उपविधीप्रमाणे सी.आर.आर., एस.एल.आर., सी.डी.रेशो., तरलता व उपलब्ध निधीचे दररोज नियंत्रण ठेऊन नियमित पालन करीत आहोत, ठेवीदार व कर्जदार याची गैरसोय होऊ नये म्हणून मर्यादित ओवेर ड्राफ्ट ची सुविधा बँकाकडून घेत आहेत, तसेच सभासदांना सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे त्यासाठी संस्थेने ठेवतारण ओवर ड्राफ्टची (अधिकर्ष / ऑ.डी.) सुविधा सुरु केलीली आहे याची सर्व सभासदांनी नोंद घेऊन सदर योजनेचा फायदा घ्यावा हि विनंती.
चालू आर्थिक वर्षात आपण सर्व साधारण २० % वाढीची अपेक्षा ठेवली आहे आणि आपल्या ठेवी २५ कोटीचा टप्पा पार करतील असे ध्येय ठेवलेले आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करीत आहे. संस्थेचे हे संधिक यश आहे सर्वांनी एकविचाराने काम केल्याने संस्थेची प्रगती होते. व्यवस्थापनाने ध्येय दिशा व धोरण ठरवल्यानंतर त्याची योग्य सोय प्रकारे अंबलबजावणी करणे हे कर्मचार्याचे कर्तव्य समजून आपल्या संस्थेचे कर्मचारी कुशलपणे, कर्तव्यानिष्ठेने, विश्वासाने, इमानदारीने व जाणीव पूर्वक दिवस रात्र प्रयत्न करतात. संस्थेच्या आज पर्यंतच्या यशात सिहाचा वाटा आहे.
सभासदांसाठी तयार केलेल्या धोरणामध्ये उत्तम व्यवस्थापन, गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेल्या संधीचा अचूक उपयोग, कार्यक्षमता, व्याजदरातील बदल सभासद संस्थेत वाढ, गुंतवणुकीस प्रोत्साहन व सुरक्षित कर्ज वितरण इत्यादींच्या उपायांनी संस्थेची प्रगतीची वाटचाल चालू ठेवण्यास संचालक मंडळास यश आले त्याचा आम्हास आनंद होत आहे. मी सर्व सभासदांना विनंती करू इच्छितो की संस्थेच्या प्रगतीमध्ये आपण मोलाची साथ द्यावी, थकबाकी वसुली संदर्भात मदत करावी, जेणे करून संस्थेने दिलेल्या कर्जाची थकबाकी होणार नाही व संस्थेस सभासदांवर जप्तीसारखी अप्रिय कार्यवाही करणे भाग पडणार नाही.
संस्थेच्या वाटचालीमध्ये थोरामोठंच्या मार्गदर्शन, सहकार्यांचे पाठबळ शाखा समिती सदस्य व सल्लागार मंडळाचे सहकार्य व कर्मचारी वर्गाकडून देण्यात येणारी तत्पर, कार्यक्षम विनम्र सेवा अनन्य साधारणत महत्व प्राप्त झालेले आहे. आपणा सर्वाकडून वेळोवेळी सहकार्य व सकारात्मक सूचना मिळत आहेत व या पुढे हि त्या मिळतील अशी मी आशा करतो आपणा सर्वाना येणार वर्ष आर्थिक वर्ष आरोग्य, सौख्य व समृद्धी लाभो हीच सी चरणी प्रार्थना !