






ठेव योजना अशी योजना आहे कि, एक विशिष्ठ रक्कम खातेदाराच्या नावावर ठेवली जाते. जमा केलेल्या रक्कमेवर ठराविक व्याज मिळते. खात्याच्या नियम व अटीनुसार ठरविलेला वास्तविक व्याज दर हा कुठल्या प्रकारचा पैसा जमा केला, किती कालावधी साठी ठेवला गेलेला आणि कुठल्या ठिकाणी जमा केलेल्या रक्कमेवरून ठरू शकतो.
आवर्त ठेव खाते म्हणजे, त्यामध्ये गुंतवणूकदार पतपेढीत एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ठ कालावधीसाठी जमा करतो (साधारणता: एक ते पाच वर्षासाठी). ह्या योजनेचा अर्थ, गुंतवणूकदार एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. एक छोठी महिन्याची ठेव, आवर्त ठेव योजना जमाकर्त्याला एक चांगली रक्कम त्याच्या परिपक्वतेच्या काळात मिळवू शकतो. ह्या वरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तिमाही गणले जाते.
ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली रक्कम एका विशिष्ठ कालावधी साठी गुंतवू शकतो आणि तो/ती/ते खालीलप्रमाणे मिळकत मिळवू शकतात. ह्या योजनॆत कमीत कमी रू. १००/- रुपयापासून रक्कम गुंतवू शकता.
ह्या योजनेत दररोज बचत करण्याची योजना मांडली आहे. ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार कमीत कमी रू. १०/- किंवा अधिक दररोज बचत करू शकतो. आमच्याकडे अधिकृत प्रतिनिधि आहेत कि जे गुंतवणूकदारांच्या राहत्या घरातून किंवा त्यांच्या व्यापाराच्या जागेवरून दररोज रक्कम गोळा करतात. दैनदिन अधिकृत प्रतिनिधीना खाते पुस्तक अपडेट करण्यासाठी संगणकयुक्त मशिन पुरवण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांचे खाते पुस्तक प्रत्येक तीन महिन्यातून एकदा जवळच्या शाखेत व्यवस्थित पड्ताळ्ण्यात येईल. गुंतवणूकदारांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो.
या योजने अंतर्गत तुम्हाला आकर्षक व्याज दर मिळेल जे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या संगोपनासाठी खूप मदतीस येईल.


गुंतवणूकदारांना एका विशिष्ट्य कालावधीत आपली रक्कम डबल करण्याची संधी देत आहे. ह्या योजनेसचे नाव सर्वच सांगून जात आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत एक विशिष्ट्य रक्कम एकदाच गुंतवुन कमीत कमी वेळात दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ह्या योजनेनुसार गुंतवणूकदारांची जमा केलीली रक्कम दामदुप्पट ठेव कालावधी १२० महिने सर्व साधारण , जेष्ठ नागरिक ११६ महिने.
१] व्यक्ती खाते उघडण्यासाठी संस्थेच्या सदस्य होणे आवश्यक आहे. नसल्यास प्रवेश शुल्क रु. ५००/- भरावे.
२] व्यक्ती वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. व्यक्ती वय १८ पेक्षा कमी वर्षे असेल तर पालकांची स्वाक्षरी घेणे.
३] खाते उघडण्यासाठी वेळ खातेदार वेळी साक्षर किंवा अशिक्षित असला तरी संदर्भ दिलेली व्यक्ती संस्था जुन्या खाते धारक असणे आवश्यक आहे.
४] खाते शाखा व्यवस्थापक पुष्टी नंतर उघडले जाईल.
* ठेवीवर अधिक व्याजदर
* जेष्ठ नागरीकांना ठेवीवर ०.२५ % अधिक व्याजदर
* संपूर्ण संगणकीकृत कामकाज
* सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत
* इतर आकर्षक योजना
राहूल अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई
नोंदणी क्रमांक: BOM / RHR / 06 / 1990
स्थापना: १ एप्रिल १९९० | ऑडिट वर्ग: 'अ' मानांकन
गेल्या ३५+ वर्षांपासून अखंड, सुरक्षित आणि विश्वासार्ह सहकार सेवा!
श्री लक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ऑफिस नं. ०२३, १ मजला, न. म. जोशी मार्ग, भायखळा (प), मुंबई - ४०००२७.
फोन: +९१ ९००४४९६१०१ / ९००४४९६१०८
ईमेल: info@rahulurban.com
वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० (रविवार सुट्टी)
Copyrights © 2026 Rahul Urban Co-Op Credit Society Ltd. सर्व हक्क सुरक्षित. | मुख्य पृष्ठ | शाखा संपर्क